News Flash

‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन; शर्मिला टागोर यांना जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्रातील सणांवर आधारित ‘फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र’ असे कार्यक्रम उद्घाटन सत्रात होणार आहेत

शर्मिला टागोर

विविधरंगी कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी (९ सप्टेंबर) उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्विजयसिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोवदिंराज यांच्यासह अभिनेते संजय खान, शेखर सुमन, सुरज पांचोली, अभिनेत्री नेहा पेंडसे, मल्लिका शेरावत, पूजा हेगडे हे कलाकार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, कथक-भरतनाटय़म-ओडिसी या नृत्यसंगमातून असलेली अरुंधती पटवर्धन, तेजस्विनी साठे आणि प्रचिती डांगे यांनी सादर केलेली गणेश वंदना, लोकमान्यांच्या सिंहगर्जनेची शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त गौरव गीताचे सादरीकरण, अभिनेत्री वर्षां उसगावकर, भार्गवी चिरमुले, अनुजा साठे, तेजस्विनी लोणारी, गिरीजा जोशी, सुशांत शेलार यांचा सहभाग असलेली ‘कलरफुल लावणी’, महाराष्ट्रातील सणांवर आधारित ‘फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र’ असे कार्यक्रम उद्घाटन सत्रात होणार आहेत. फेस्टिव्हलमध्ये पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर यांच्यावर आधारित ‘कपूर्स डायरी’, गजाननराव वाटवे जन्मशताब्दीनिमित्त ‘गगनी उगवला सायंतारा’, मराठी हास्य कविसंमेलन, कर्नाटकी शास्त्रीय संगीत, ‘व्हाईस ऑफ पुणे’ ही गायन स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:18 am

Web Title: sharmila tagore to get lifetime achievement award in pune festival
Next Stories
1 संगणक अभियंता मैत्रिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
2 पुन्हा खाकीवर हल्ला, संशयित चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार
3 भाजपमध्ये असंतोष खदखदतोय – अजित पवार
Just Now!
X