News Flash

शिवजयंतीनिमित्त उत्साही मिरवणुका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शहराच्या विविध भागांतून उत्साही मिरवणुका काढण्यात आल्या.

शिवजयंतीनिमित्त भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून मुख्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीतील शिवप्रतिमेचे पारंपरिक पद्धतीने महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शहराच्या विविध भागांतून उत्साही मिरवणुका काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मुख्य मिरवणुकीचा  प्रारंभ भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरातून करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध सार्वजनिक मंडळांनी शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे सादर केले होते. देखावे पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर गर्दी झाली होती.

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पालखीतील शिवप्रतिमेचे पूजन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर विविध मंडळांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. चौका-चौकात भगवे ध्वज तसेच पताका लावण्यात आल्या होत्या.

प्रभात मित्र मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत यंदा शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तुळजाभवानी देवीच्या मुख्य रथावर विराजमान शिवप्रतिमा, हिंदू धर्माचे ऐक्य दर्शविणारा समरसता रथ मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. तसेच मंडळाकडून देण्यात येणारा यंदाचा प्रभात शौर्य पुरस्कार हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यावतीने त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. जंगम मठ मन्मथधाम संस्थान कपिलधार बीड जिल्ह्य़ाचे वेदांताचार्य डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उत्सव प्रमुख नितीन राऊत, रवींद्र भन्साळी, विवेक फुले या वेळी उपस्थित होते.

स्वराज्य मित्र परिवार, जिजामाता पुरस्कार वितरण समिती आणि स. प. महाविद्यालय यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी हिराबाग कॉर्नरपासून स. प. महाविद्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, पांडुरंग बलकवडे, पं. वसंतराव गाडगीळ, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, डॉ. दिलीप शेठ, महेश लडकत या वेळी उपस्थित होते. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ आणि प्रमुख सरदारांच्या वंशजाचा विशेष सहभाग होता.

देशभक्ती मित्र मंडळाच्या वतीने संत कबीर चौकापासून मिरवणूक  काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये ‘शिवकल्याण राजा’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. सोळा कलाकारांनी शिवरायांच्या आयुष्यातील विविध घटनाक्रम आपल्या कलेतून उलगडून दाखविले. मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊत, प्रतीक गोळे, आशिष धामणेकर या वेळी उपस्थित होते. युवा सेनेच्या वतीने वानवडीमधील केदारी नगरमध्ये शिवरायांच्या प्रतिमेला शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपविभागप्रमुख मकरंद केदारी, प्रसाद बाबर, अखिलेश जांभुळकर या वेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने लष्कर भागात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. मुस्लीम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, प्रीती चौधरी, रुकसार खान या वेळी उपस्थित होत्या.

पिंपरीतही शिवजयंती उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पिंपरी चिंचवड शहरामध्ये उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी  छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने पक्षाच्या अजमेरा कॉलनीमधील कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, निगार बारस्कर, महासचिव अशोक मंगल, संदेश नवले, अमर नानेकर, राजन पिल्ले, उमेश बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मधुकर बच्चे युवा मंच आणि चैतन्य मेडिको चिंचवड यांच्य वतीने केशवनगर येथे शिवजयंती साजरी केली.  केमिस्ट असोसिएशनचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी मेगनाथ देठ, नीलकंठ उपाध्ये उपस्थिती होते. या वेळी पर्यावरणास हानिकारक प्लास्टिक वापर नागरिकांनी टाळावा यासाठी कागदाच्या पिशव्या देऊन जनजागृती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप युवा प्रभाग अध्यक्ष सौरभ शिंदे गणेश बच्चे आदीनी सहभाग घेतला.

काळेवाडी येथे काळूबाई प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानने मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत वाचलेल्या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठीच्या खर्चाची सोय करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने  गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच भेटवस्तू देण्यात आल्या,तसेच विद्यार्थ्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सुधाकर नलावडे, सुनिता संधु, गौरव केरकर, प्रशांत तरवटे, किशोर भोंगळे, देवेन मोटवानी, शुभम उनवणे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. महासंघाच्या वतीने थेरगांव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महासंघाचे शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, महेश बारसावे, संजीवनी पांडे, सुहास पोफळे, नंदू भोगले, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 4:50 am

Web Title: shiv jayanti celebration in pune
Next Stories
1 पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकरांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
2 सैन्यात जाण्याआधी पुण्याचा तरुण चालवायचा टॅक्सी
3 पुण्यातील चहा विक्रेता महिन्याला किती लाखांची कमाई करतो ठाऊक आहे?
Just Now!
X