राज्यात इतर सणांप्रमाणेच शिवजयंतीच्या उत्साहावर करोनानं पाणी फेरलं आहे. तरीही सगळी सगळी उत्साहाच वातावरण असून, किल्ले शिवनेरीवर थाटात शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान करोनाच्या संकटाबद्दल चिंता व्यक्त करत पुढील वर्षापासून राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती स्वराज्य दिन म्हणून साजरी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात केली.
‘यंदाची शिवजयंती करोना विषाणूंच्या राज्यभरात साध्या पद्धतीने साजरी करीत आहोत. तर आज आपण जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे प्रार्थना करुयात की, करोनाच संकट दूर होऊ दे आणि पुढील जंयती लाखोंच्या संख्येत साजरी करू. माझ्या अखत्यारीत येणार्या महाविद्यालयात पुढील वर्षापासून शिवजयंती ही प्रत्येक महाविद्यालयात स्वराज्य दिन म्हणून साजरी केली जाईल. याबाबतचा आदेश काढला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पुण्यातील लालमहाल येथील जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 2:28 pm