पुणे : महापालिके ची आगामी निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने होण्याचे संके त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मात्र या पद्धतीबाबत वेगळा सूर लावण्यात आला आहे. मुंबई महापालिके प्रमाणे एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक दोन सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे घेण्याचे संके त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात दिले. या पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून जातील. यापद्धतीबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने शहरातील पाचही प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांशी संवाद साधला. त्यावेळी या निर्णयाचे भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत के ले. शिवसेनेने मात्र एक सदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी के ली आहे.

‘महापालिके ची निवडणूक द्वीसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली तरी निवडणुकीत भाजपची सत्ता येईल. कोणत्या पद्धतीने निवडणूक घ्यायची हे सरकारकडून ठरविले जाईल. मात्र राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. नागरिकांची कामे होण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया निश्चित करावी. द्वीसदस्यीय पद्धत भाजपलाही अनुकू ल ठरेल, यात शंका नाही,’ असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, प्रभागाचा समतोल विकास होण्याच्या आणि महिलांनाही योग्य प्रमाणात संधी मिळण्याच्या दृष्टीने दोन नगरसेवकांचा एक प्रभाग असणेच योग्य आहे. अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. अनेक आजी-माजी नगरसेवकांनी तशी मागणी के ली आहे. त्यामुळे या पद्धतीने निवडणूक घेणे योग्यच ठरेल.

‘तीन नगरसेवकांचा एक प्रभाग किं वा सध्याचा चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीला शिवसेनेचा विरोध आहे. आगामी निवडणूक कोणत्या पद्धतीने घ्यायची, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. तो आम्हाला मान्य असेल. मात्र मुंबई महापालिके प्रमाणेच एक नगरसेवक एक प्रभाग या पद्धतीने पुण्यातही निवडणूक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे के ली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा द्वीसदस्यीय प्रभाग पद्धतीत शिवसेनेला फायदा होईल,’ अशी भूमिका शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी मांडली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, एक सदस्यीय प्रभाग पद्धतीप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसला सत्ता मिळाली होती. द्वीसदस्यीय प्रभाग ही पद्धतीही काँग्रेससाठी कायमच अनुकू ल राहिली आहे. चार सदस्यीय किं वा तीन सदस्यीय प्रभागाला काँग्रेसचा विरोध आहे. त्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील. ‘सन २०१२ मध्ये द्वीसदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली. त्यामध्ये मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षासाठी द्वीसदस्यीय प्रभाग फायदेशीर आहे. चार सदस्यांच्या प्रभागाला विरोध आहे. मात्र जो निर्णय होईल त्यानुसार मनसेकडून निवडणूक लढली जाईल. एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. चार सदस्यांचा प्रभाग करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे द्वीसदस्यीय प्रभाग पद्धतीप्रमाणेच निवडणूक होईल. त्याचा मनसेला फायदा होईल,’ असे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट के ले.

राजकीय पक्ष काय म्हणतात..

  • द्विसदस्यीय प्रभागातही विजयाचा भाजपचा दावा
  • एक सदस्यीय प्रभागाची शिवसेनेची मागणी
  • तीन किंवा चार सदस्यीय प्रभागाला काँग्रेसचा विरोध
  • समतोल विकासासाठी द्विसदस्यीय पद्धतीचा राष्ट्रवादीचा आग्रह
  • द्विसदस्यीय पद्धत फायदेशीर मनसेचे म्हणणे