16 January 2019

News Flash

पवारांनी पुणेरी पगडी नाकारणे म्हणजे पुणेकरांचा अपमान: संजय राऊत

शरद पवार यांच्या प्रत्येक कृतीत काही ना काही अर्थ असतो. त्यांनी जे विधान केले आहे. त्या पगडीच्या मागे काय राजकारण दडले आहे. ते लवकरच बाहेर

संजय राऊत, शिवसेना खासदार

पुणेरी पगडी ही पुणेकरांचा सन्मान आणि वैभव असून सर्वांनी पगडीचा सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे शरद पवारांनी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान आहे, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या प्रत्येक कृतीत काही ना काही अर्थ असतो. त्यांनी जे विधान केले आहे. त्या पगडीच्या मागे काय राजकारण दडले आहे. ते लवकरच बाहेर येईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुढील कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीने प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे, असे विधान केले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांना ती पगडी घालून याची सुरुवात केली होती. या विधानाचे आणि कृतीवर पुणे शहराच्या राजकारणात चांगली चर्चा रंगली होती. त्यात आज (मंगळवार) पुण्यात महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान आणि शिवसेना कसबा विभागाचे वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्यांचा आणि पोलीस अधिकारी यांचा विशेष सन्मान राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शरद पवार यांच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली.

First Published on June 12, 2018 8:08 pm

Web Title: shiv sena mp sanjay raut slams on ncp president sharad pawar on puneri pagdi politics