28 February 2021

News Flash

मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी पुणे महापालिकेत शिवसेनेचा राडा

शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील मानदंड उचलण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांनी मानदंड बाजूला घेतला.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आज पुणे महापालिकेतही बघायला मिळाले. शिवसेने मराठा आरक्षणाला आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यावरूनच पुणे महापालिकेत अभूतपूर्व राडा बघण्यास मिळाला. भाजप विरोधात विरोधकांनी आंदोलन केले.यावेळी भूमिका मांडू न दिल्याने सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले महापौरांसमोरील साहित्य फेकून निषेध व्यक्त केला.

मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्यात यावी.अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे विरोधकानी केली.मात्र त्यावर काही बोलू दिल्याने त्याच्या निषधार्थ शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील मानदंड उचलण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी भाजप नगरसेवक दीपक पोटे यांनी मानदंड बाजूला घेतला.त्यामुळे संजय भोसले यांनी महापौरासमोरील साहित्य फेकून दिले.त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाच्या अंगावर भाजप नगरसेवक धाव गेले.या घटनेमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.तर भाजप आणि विरोधकानी एकमेका विरोधात घोषणाबाजी केली.सभागृहातील परिस्थिती लक्षात घेता.महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केली.महापौरा समोरील साहित्य फेकून दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेवकावर कारवाई करावी.अशी मागणी देखील भाजप नगरसेवकाकडून सभागृहात करण्यात आली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणीने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर चार दिवसापासून राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने ठिय्या आंदोलनात करण्यात येत आहे.तर काही ठिकाणी हिंसक वळण देखील मिळाल्याचे पाहावयास मिळाले आहे.या सर्व घडामोडीवर मुंबई, पालघर आणि ठाणे बंदची हाक दिली.औरंगाबाद येथील देवगाव रंगारी येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जगन्नाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी बस फोडण्याच्या आणि रस्ता रोको च्या घटना घडल्या आहेत.तर आज पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेच्या सुरुवातीला काँग्रेस,राष्ट्रवादी,मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे.या मागणीसाठी आंदोलन केले.त्यामुळे अर्धा तास काम ठप्प राहिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 4:13 pm

Web Title: shiv sena protest in pune municipal corporation on maratha reservation
Next Stories
1 देशात घरांची विक्री मंदावलेलीच!
2 फेसबुकवर झालेल्या ओळखीतून तारांकित हॉटेलच्या शेफला गंडा
3 पुणेकरांना वाघ प्रिय!
Just Now!
X