News Flash

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व पर्यावरणीय परवानग्या मिळाल्या

स्मारकासाठी गठित केलेल्या समितीच्या शिफारशींनुसार, आता या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

| February 14, 2015 03:15 am

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या केंद्र सरकारच्या आणि पर्यावरणाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. स्मारकासाठी गठित केलेल्या समितीच्या शिफारशींनुसार, आता या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिवस्मारकासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री तसेच, केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी विक्रमी वेळात परवानगी दिली आहे. त्यासाठी अधिसूचनेत करावयाच्या सुधारणा आठवडय़ाच्या आत करण्यात आल्या आहेत. त्यावर सूचना व हरकतींच्या प्रक्रियेत एक सूचना आली होती. तीसुद्धा तातडीने निकाली काढण्यात आली. आता केंद्र आणि पर्यावरण विभागाच्या सर्व आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. आता त्यासाठीची कोणताही परवानगी राहिलेली नाही, त्यामुळे शिवस्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे जगातील सर्वात भव्य स्मारक असेल, असे सांगून फडणवीस यांनी जावडेकर यांचे आभार मानले.
यापूर्वी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी स्मारकाचे भूमिपूजन होणार नाही. स्मारकासाठी गठित केलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार, कामासाठीच्या निविदा मागवण्यात येतील. त्या आल्यानंतर भूमिपूजन आणि कामाला एकदमच सुरुवात होईल. ही प्रक्रियासुद्धा लवकर सुरू केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:15 am

Web Title: shiv smarak devendra fadnavis eco permission tender
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 ‘आरटीओ’त एजंटगिरीचे दुकान आता लपून-छपून
2 शिक्षण मंडळाच्या अधिकाराचा घोळ वाढला
3 भाऊसाहेब भोईर, विनोद नढे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
Just Now!
X