छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी चित्रे पाहण्याची आणि त्यांची माहिती ऐकण्याची संधी इतिहास प्रेमींना मिळणार आहे.
भारतात आणि परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक जुनी चित्रे आहेत. बहुतेक चित्रे ही महाराज असताना आणि काही त्यांच्या निधनानंतर पाच वर्षांच्या आत काढलेली आहेत.  ही चित्रे पाहण्याची आणि त्यांचा इतिहास समजून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन हे या चित्रांवर सादरीकरण करणार आहेत. या वेळी उपलब्ध असलेली चित्रे पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे उपलब्ध नसलेली चित्रे स्लाईड शोच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. ही चित्रे कधी काढली, कुणी काढली, त्यामागचा इतिहास अशी सर्व माहिती पटवर्धन आणि कुलकर्णी देणार आहेत. शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.