News Flash

‘पाणी द्या, अन्यथा जलवाहिनीला विरोध’ – खासदार आढळराव पाटील

पालिकेची जलवाहिनी टाकण्यात येणारी गावे व आळंदी शहराला पाणी देण्याबाबत पालिका सकारात्मक निर्णय घेत नाही तोवर शेतकऱ्यांचा जलवाहिनीला विरोध कायम राहील.

| March 5, 2015 02:55 am

पालिकेची जलवाहिनी टाकण्यात येणारी गावे व आळंदी शहराला पाणी देण्याबाबत पालिका सकारात्मक निर्णय घेत नाही तोवर शेतकऱ्यांचा जलवाहिनीला विरोध कायम राहील, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे.
आढळराव यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून, भामा आसखेडमधून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, या शेतकऱ्यांना माझा पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. धरणासाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन द्यायची, जलवाहिनीसाठीही शेतकऱ्यांनी जागा द्यायची, पण या शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास नकार द्यायचा, ही पालिका अधिकाऱ्यांची भूमिका अनाकलनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पालिकेची जलवाहिनी ज्या गावांमधून टाकण्यात येणार आहे. त्या गावांना पालिकेने पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतकरी जलवाहिनीला विरोध करण्याची भूमिका बदलणार नाहीत. पालिकेला योजना राबवायची असेल, तर त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 2:55 am

Web Title: shivajirao adhalrao patil water pipeline oppose
Next Stories
1 जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम मिळवणाऱ्या संस्थांचे पितळ उघड
2 पुण्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू
3 पीएमपीला विक्रमी उत्पन्न; एक कोटी नव्वद लाख जमा
Just Now!
X