शिवशाही बसचा अपघात चालकाच्या प्रसंगावधानामुळे होता होता टळला आहे. पुण्याजवळ असलेल्या नारायणगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. शेजारून जाणाऱ्या कार चालकाने बसचे चाक निखळायला आले आहे अशी कल्पना बसचालकाला दिली. त्यानंतर बस चालकाने तातडीने बस थांबवली आणि हा अपघात टळला. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये त्यावेळी १७ प्रवासी होते. हे सगळे प्रवासी सुखरूप आहेत. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या बसने त्यांना पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण गाव जवळ शिवशाही बस क्रमांक एम.एच-०९ इ.एम-१८७६ चा मोठा अपघात टाळला आहे.नाशिकहून कोल्हापूर ला ही बसच्या निघाली होती, तेव्हा नारायणगाव जवळ चाकाचे नट निखळले होते. मागील चाक असल्याने दुसऱ्या चाकाला घासून त्याचा आवाज येऊ लागला. ही गोष्ट कार चालकाने बस चालकाला लक्षात आणून दिली. ज्यामुळे बसचा अपघात टळला. काल ती कोल्हापूरहून नाशिकला गेली होती, तिथून बस परतत होती, तेव्हा १७ प्रवासी गाडीत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप असून, नारायणगाव बस डेपोमधून दुसऱ्या बसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 2:12 pm