News Flash

धक्कादायक : ११ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील घटना

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील ११ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील पठारे वस्ती येथील एका कुटुंबातील ही मुलगी होती. दरम्यान, आज या मुलीचे वडील कामावरून जेवणासाठी घरी परतले तेव्हा त्यांना घरातील एका खोलीत त्यांच्या मुलीने ओढणीच्या सहायाने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रूग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. याप्रकरण पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 7:53 pm

Web Title: shocking 11 year old girl commits suicide by hanging herself at her residence msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे : ७० वर्षीय नराधमाकडून १० वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार
2 Pune MIDC Fire : कंपनीचा मालक निकुंज शाहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
3  ‘स्वच्छ’संस्थेला काम देण्याचा खेळ
Just Now!
X