पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,४१६ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज पहिल्यादाच शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येमुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३०,५२३ वर पोहोचली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच पुण्यात आज दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ८८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ७४६ रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १९ हजार ५७० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज नव्याने ४४९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर १५ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ८ हजार ६०३ वर पोहचली असून ५ हजार २३५ जण करोनामुक्त झाले आहेत.

आत्तापर्यंत शहरातील १४३ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लॉकडाउनचा आजचा दुसरा दिवस असतानाही संसर्ग झालेल्या रुग्णांची आकडेवारी मात्र वाढतच आहे.