पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज एकाच दिवसात २५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २६६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकाच दिवशी २५ रुग्णांच्या मृत्यूमुळे पुणेकरांसाठी चिंतेची बाब समजली जात आहे.

करोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, तरी देखील रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यात आज दिवसभरात नव्याने २६६ रुग्ण आढळल्याने, ६ हजार ७९५ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एकाच दिवसात २५ रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुणेकर नागरिकांची चिंता वाढली आहे. तर करोनावर उपचार घेणार्‍या १६९ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ११९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ही दुसर्‍या बाजूला समाधानाची बाब असताना आता वाढत्या रुग्णांच्या मृत्यूदरावर महापालिका प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.