पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने तब्बल ८७७ रुग्ण आढळले तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ हजार १०५वर पोहोचली आहे. तर आज अखेर ६६२ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या ५८९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ११ हजार ४० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २१२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १२४ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला असून चिंता व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या ३ हजार २३० वर पोहचली आहे. आत्तापर्यंत २,१६४ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबत माहिती दिली.