वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कळमोडी येथे १३ वर्षाच्या निरागस मुलीवर ५३ वर्षीय वडिलाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम पिता पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आणि मोठा भाऊ हा मावशीकडे गेले होते. याचाच फायदा या नराधम पित्याने घेतला. पीडित मुलगी, नराधम वडील आणि लहान मुलगा हे एकत्र झोपले होते. लहान मुलाला झोप लागल्यानंतर मुलीला झोपेतून उठवून दुसऱ्या खोलीत गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरडाओरडा केला तर तुला आणि तुझ्या लहान भावाला जिवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. या घटनेबाबत सविस्तर माहिती पीडित मुलीने आईला दिली. त्यानुसार नराधम वडिलाविरोधात खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी ५३ वर्षीय वडील पसार झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव हे करत आहेत.