News Flash

धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी तरुणाला विवस्त्र फिरवलं

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील हडपसर आणि खराडी भागात पैशांसाठी तरुणाचे अपहरण करून त्याला रस्त्यावरुन विवस्त्र फिरवल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील एका गॅरेज चालकाकडे १६ नोव्हेंबर रोजी एक गाडी दुरुस्तीसाठी आली होती. त्यावेळी आरोपीने ओळखीच्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये घ्यावे, असे गॅरेज चालकास सांगितले. मात्र, गॅरेज चालकाने अडीच लाख रुपयेच घेतले. यामुळे भडकलेल्या आरोपीसह त्याच्या ८ जणांच्या गटाने गॅरेज चालकाचे अपहरण केले. त्यानंतर हडपसर आणि खराडी भागात नेऊन त्याला भररस्त्यात विवस्त्र फिरवले. दरम्यान, पीडित तरुणाला सिगारेटचे चटके देण्याचाही प्रकार घडला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 6:43 pm

Web Title: shocking pune youth kidnapped and moving naked in city for money in video viral
Next Stories
1 क्रूरतेचा कळस ! जेसेबी अंगावर चढवून बैलाची हत्या, इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
2 पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीनजण जखमी
3 कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ पुणे जिल्ह्यातून तडीपार
Just Now!
X