करोनाच्या संसर्गामुळे गावोगावी भरणारे आठवडे बाजार बंद झाले. आठवडे बाजारात मेंढपाळ बकरे, मेंढ्या विक्रीस घेऊन येतात. मात्र बाजार बंद राहिल्यामुळे बकरे, मेंढ्यांचा तुटवडा झाला असून परिणामी, मटणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडभरात मटणाच्या दरात प्रतिकिलोमागे ४० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.

सामिष खवय्ये मटणाला पसंती देतात. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी भरणारे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मेंढपाळांकडून बाजारात मेंढी, बकरे विक्रीस पाठविणे बंद करण्यात आले आहे. गावोगावी भरणाऱ्या आठवडे बाजारातून होणारी आवक बंद झाल्याने मटण विक्रेत्यांना सहजतेने बकरे, मेंढी उपलब्ध होत नसल्याने दरात वाढ झाली आहे, अशी माहिती पुणे मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका

पश्चिम महाराष्ट्रातील अकलूज, लोणंद, नातेपुते, म्हसवड येथे बकरे, मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो, तसेच पुणे जिल्ह््यातील चाकण, घोडनदी, तळेगाव ढमढेरे, भिगवण, यवत, नगरमधील राशीन, सायखेडा येथील बाजार बंद असल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर बकरे, मेंढ्यांचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मटणाच्या दरात किलोमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

सांगलीत मटण, चिकन दरात वाढ

सांगलीत चिकनच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो चिकनची विक्री २०० रुपये दराने केली जात आहे. मटणाच्या दरात प्रतिकिलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो मटणाचे दर ७०० (चरबीसह) आणि ७५० रुपये (चरबीशिवाय) असे आहेत. उन्हामुळे मटण, चिकनला मागणी कमी असली, तरी दरात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील यात्राही बंद आहे. त्याचा परिणाम झाला आहे.

ठाणे, मुंबईत मटण महागले

ठाणे, मुंबईत सध्या मटणाची विक्री ७०० रुपये किलो दराने केली जात आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर बाजारात बकऱ्यांचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे मटणाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असून एक किलो मटणाचे दर साडेसातशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे ठाण्यातील मटण विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

बाजारात सध्या चिकन, मासळीचा तुटवडा जाणवत आहे. बर्ड फ्ल्यूमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे कोंबड्यांची आवक कमी होत आहे. चैत्र महिन्यात गावोगावी भरणाऱ्या यात्रेत मटणाला मागणी असते. निर्बंधामुळे मटण विक्रेत्यांना बकरे, मेंढ्या मिळवण्यात अडचण निर्माण झाली आहे.

– प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे मटण दुकानदार संघटना