27 January 2021

News Flash

‘मंत्रिमहोदयां’च्या घोषणेसाठीच पुणे विद्यापीठाला ‘कारणे दाखवा’

विद्यापीठाने कोणत्या नियमाच्या आधारे महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही केली, याचा खुलासा मागवण्यात आला

पुणे : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती फे सबुक लाइव्हद्वारे शनिवारी दिली. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबतची घोषणा करण्याची संधी मंत्र्यांना मिळण्यासाठीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११ जानेवारीपासून शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च शिक्षण संचालनालयाने‘कारणे दाखवा’ नोटिस बजावल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त के ली होती. या समितीच्या अहवालानुसार ११ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके  आणि प्रकल्प करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश देण्याचा आणि सत्र परीक्षेनंतर प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीला परिपत्रकाद्वारे घेतला होता. मात्र उच्च शिक्षण संचालनालयाकडून ७ जानेवारीला विद्यापीठाला कारणे दाखवा नोटिस बजावून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेसंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला नसल्याचे नमूद करत विद्यापीठाने कोणत्या नियमाच्या आधारे महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही केली, याचा खुलासा मागवण्यात आला. या नोटिशीनंतर विद्यापीठाला ११ जानेवारीपासून शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय स्थगित करावा लागला.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची अधिसभा शनिवारी (९ जानेवारी) सुरू झाली. त्याचवेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनीही फे सबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. त्यात मुख्यमंत्री आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या ५० टक्के  उपस्थितीसह सुरू करण्याबाबतचा निर्णय २० जानेवारीपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. मग सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि २० जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू करणे यात किती मोठा काळ आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्य शासनाच्या विरोधात जाऊन अंतिम वर्ष परीक्षा घेण्यासाठी सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने आग्रही भूमिका घेतली होती. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाची ‘परवानगी’ न घेता महाविद्यालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उच्च शिक्षण संचालनालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

तुम्ही काय स्वयंभू आहात का?

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध के ले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागातून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे ‘तुम्ही कोणत्या नियमाच्या आधारे हा निर्णय घेतलात’, ‘तुम्ही काय स्वयंभू आहात का’ अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:39 am

Web Title: show cause notice to savitribai phule of pune university zws 70
Next Stories
1 पुण्यात २८२ जणांना तर पिंपरी-चिंचवडमध्ये १६७ जणांना करोनाची लागण
2 महेश कोठे यांच्या प्रवेशाविषयी अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
3 खंडाळयात पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह
Just Now!
X