26 September 2020

News Flash

पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती

देशभरात प्रसिद्ध आहे दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फक्त पुणेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धेचं स्थान आहे. पुण्यातील गजबजलेल्या लक्ष्मी रोडवर असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने जगभरातील आपल्या वाचकांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या मंडळाची स्थापना १८९३ साली झाली. १८९३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी मुर्तीची स्थापना केली. १९६८ साली ‘दगडूशेठ गणपती’ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती पूर्ण झाली. मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.

दगडूशेठ हलवाई गणपतीचा थोडक्यात इतिहास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठ भागात असलेले दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहण्याची इमारत होती. त्याकाळी पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या दोघांना दुःख झालं. याच काळात त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की आपण काही काळजी करु नका एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा वर त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवतं आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. अशा रितीने तयार झाली ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. १८९६ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला. याच काळात दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. पण त्यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली. १९६७ मध्ये पुन्हा एकदा नवी मूर्ती तयार करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 9:43 pm

Web Title: shrimant dagdusheth halwai ganpati aarti live 2020 from pune scj 81
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू,१ हजार ५५६ नवे करोनाबाधित
2 करोनामुळे गणेश मूर्तींचे दर कमी, विक्रीमध्येही ३० टक्क्यांनी घट
3 करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुठल्याही गणपतीच्या दर्शनाची परवानगी नाही – अजित पवार
Just Now!
X