28 May 2020

News Flash

कवितेमध्ये मानवी संस्कृतीची प्रामाणिकता असावी

उचित माध्यम प्रकाशित हरीश तारू यांच्या ‘बिनवासाचा चाफा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले.

डॉ. श्रीपाल सबनीस यांची अपेक्षा

कविता ही काही ठरवून होत नसते. जगण्यातील दु:ख, विरह आणि जगण्यातील अनुभवातून जशी कविता सुचते तशीच ती हळुवार आणि उत्कट प्रेमातूनही सुचते. मात्र, त्या कवितेमध्ये मानवी संस्कृतीची प्रामाणिकता असावी, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी व्यक्त केली.

उचित माध्यम प्रकाशित हरीश तारू यांच्या ‘बिनवासाचा चाफा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रकाशक रेश्मा जीवराज आणि हनुमंत जगनगडा या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात हरीश तारू आणि अभिजित थिटे यांनी कविता सादरीकरण केले.

सबनीस म्हणाले, केवळ प्रेमालाच नव्हे तर विरहालाही गंध असतो. प्रेम ही केवळ नैसर्गिक भावना नाही, तर प्रेम हे मूल्य आहे. जीवनामध्ये आलेले अनुभव, बसलेले चटके, जातिभेदाच्या भिंतीने केलेले आघात याचे प्रतििबब ‘बिनवासाचा चाफा’ कवितासंग्रहामध्ये आहे.

एका अर्थाने ‘सैराट’ चित्रपटाची समकालीन काव्यसंहिता म्हणून या संग्रहाकडे बोट दाखवता येईल. जगण्यातील वेदना, प्रेमातून आलेला विरह याबरोबरच समाजातील विविध प्रश्नदेखील कवितेतून मांडले जावेत.

संगीता बर्वे म्हणाल्या, परिस्थितीशी झुंजताना अनेकदा सुचते, पण प्रत्येकालाच ते शब्दांत अभिव्यक्त करता येत नाही. कवितेमुळे माणसे जोडली जातात.

हरीशने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्याच्या कवितांना गजलचा सुगंध आहे. गजल काव्यप्रकाराचा बारकावा समजून घेतला तर तो गजलकार होऊ शकेल. शब्द हेच धन असले तरी तेवढेच धन पुरत नाही. त्यामुळे कवीने वेगवेगळय़ा अनुभवांना सामोरे जात शब्दाने आणि संपत्तीने धनवान होण्याची गरज आहे.

हरीश तारू यांनी मनोगत व्यक्त केले. जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 3:13 am

Web Title: shripal sabnis commented on poetry culture
टॅग Shripal Sabnis
Next Stories
1 पंचवीस टक्क्य़ांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
2 द्रुतगती महामार्गावर तवेरा गाडीच्या अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जखमी
3 पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा खून
Just Now!
X