महामंडळाविरोधात सबनीसांचा उपोषणाचा इशारा
साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील वादाने आता नळावरील भांडणाचे रूप धारण केले असून येत्या चार दिवसात आपले भाषण प्रसिद्ध न केल्यास सपत्नीक उपोषणाचा इशारा सबनीस यांनी दिला आहे, तर ही मागणी पूर्ण करण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांना सांगितले.
पिंपरीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण केवळ वेळेत हाती न आल्यामुळे छापून घेता आले नाही, मात्र आता ते संपूर्णपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्य यांनी दिली. मात्र २६ जानेवारीपर्यंत जर या भाषणाची प्रत आपल्याला मिळाली नाही, तर महामंडळाचे कार्यालय असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोर आपण पत्नीसह लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सबनीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
खर्च कुणावर जमा?
श्रीपाल सबनीस यांनी आपले भाषण माध्यमांकडे ईमेलद्वारे पाठवले होते. त्यांनी एका मित्राच्या मदतीने त्याच्या दोन हजार प्रती संमेलनाच्या मांडवात उपलब्धही केल्या होत्या. अध्यक्षीय भाषण सुमारे सव्वाशे पानांचे होते. त्यासोबत काही नकाशेही देण्यात आले होते. सबनीस यांनी स्वखर्चाने हे भाषण मुद्रित करून घेतले असून त्याच्या प्रती त्यांनी माध्यमांना दिल्या. मात्र महामंडळाने हे भाषण (सत्ताबाजार)
महामंडळाने वेळेत भाषण छापून ते साहित्य संमेलनस्थळी वितरित केले नाही. अशा पद्धतीची सेन्सॉरशिपची कात्री लावणे ही एक प्रकारची असहिष्णुतेची ठेकेदारी आहे. महामंडळाने राज्य घटनेचाच अवमान केला आहे.
– श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष