मावळचे विद्यमान खासदार आणि आगामी लोकसभा निवडणुकीचे युतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार हे शुक्रवारी समोरासमोर उभे ठाकले. निमित्त होते जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन बीजोत्सव सोहळ्याचे. तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी दोघेही मंदिरात एकमेकांच्या समोरा आले, याचे छायाचित्र लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरॅत टिपले.

येन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असे चित्र पाहायला मिळत नाही. परंतू, आज जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही उमेदवारांनी देहू नगरीत उपस्थिती लावली. दरम्यान, तुकोबांच्या चरणी माथा टेकण्यासाठी हे दोघेही एकाच वेळी मंदिरात दाखल झाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तेव्हा, श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार असे म्हणत आपणच इथले अनभिषिक्त खासदार आहोत, असे सुचित केले होते.

त्यानंतर जेव्हा पार्थ पवारांना उमेदवारी मिळाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बारणे यांनी लगावलेला टोल्यावर प्रश्न विचारला त्यावेळी मला विरोधी उमेद्वारांबद्दल काहीही बोलायचं नाही ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. मला फक्त काम करायचं आहे, त्यांना बोलण्यातून आनंद मिळत असेल तर त्यांनी बोलावं. मला फक्त काम करण्याचा आनंद मिळतो. माझा स्वतंत्र अजेंडा आहे असे पार्थ पवार म्हणाले होते.