News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाची रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील २९० वस्तूंची वेगवेगळ्या दालनांमध्ये मांडणी करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेल्या भारतरत्न किताबासह अनेक दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या वापरातील वस्तू असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. सिम्बायोसिस संस्थेने सेनापती बापट रस्त्यावर उभारलेले हे संग्रहालय म्हणजे विद्यार्थी, अभ्यासक, आंबेडकरी विचारांचे अनुयायी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांसाठीही महत्वपूर्ण वास्तू झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू, पुस्तके  जपली जावीत अशी त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. सिम्बायोसिसने विधी महाविद्यालय सुरू केल्यानंतर माईसाहेब आंबेडकर यांनी सिम्बायोसिसला या वस्तूंच्या जपणुकीबाबत विचारणा केली. त्या प्रस्तावाला सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात, १४ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर बांधकाम पूर्ण होऊन २६ नोव्हेंबर १९९६ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती के . आर. नारायणन यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील २९० वस्तूंची वेगवेगळ्या दालनांमध्ये मांडणी करण्यात आली आहे. राज्य घटना लेखनासाठी त्यांनी वापरलेली टेबल-खुर्ची, त्यांचा पलंग, त्यांचे व्हायोलिन अशा वस्तूंचा त्यात समावेश आहे. तसेच पाचशेहून अधिक ग्रंथ, त्यांना मिळालेला भारतरत्न किताब, अस्थीकलश, त्यांच्या नित्यपुजेतील बुद्ध मूर्तीही या संग्रहालयात आहे. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर या दोन दिवशी या संग्रहालयाला नागरिक मोठ्या संख्येने भेट देतात. गेल्या २५ वर्षांत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, दलाई लामा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकु मार शिंदे अशा अनेक मान्यवरांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत या संग्रहालयाला मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंची जपणूक करण्यासाठी संवर्धन प्रयोगशाळा करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथांचे डिजिटायझेशनही के ले आहे. त्यासह ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्ष, लहान मुलांसाठी विविध उपक्रमही सुरू के ले. संग्रहालयाचा माहितीपट के लेला आहे. देशातील महत्वाच्या संग्रहालयांच्या ऑनलाइन प्रकल्पात डॉ. आंबेडकर संग्रहालयाचा समावेश असल्याने  https://www.museumsofindia.org/museum/555/dr-babasaheb-ambedkar-museum-and-memorial ’ या दुव्याद्वारे जगभरातून कु ठूनही हे संग्रहालय ऑनलाइन पद्धतीने पाहता येऊ शकते. संग्रहालयाचे मोबाईल अ‍ॅपही करण्यात आले आहे.

– संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:13 am

Web Title: silver jubilee of dr babasaheb ambedkar museum abn 97
Next Stories
1 चिमुकल्याच्या श्वासनलिकेतून काढला काचेचा तुकडा
2 लसीसाठी महापालिका अधिकाऱ्यांचे क्रमांक
3 पुणे : कपाऊंडरचा प्रताप; दोन वर्षांपासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
Just Now!
X