04 March 2021

News Flash

‘लतादीदी-आशाताईंचे गाणे संगीतबद्ध करायचे आहे’

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य अद्वितीय आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन दिग्गज गायिकांना पुन्हा एकदा एकत्र संगीतबद्ध करणे हे माझे स्वप्न आहे, अशी इच्छा प्रसिद्ध पाश्र्वगायिका वैशाली सामंत यांनी शुक्रवारी प्रदर्शित केली. त्यांनी होकार दिला तर सावित्रीबाई फुले यांच्यावरील चित्रपटासाठी हे गीत स्वरबद्ध करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. सध्या िहदी चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्याबरोबरच संगीतकार म्हणूनही खूप काम करायचे आहे, असेही त्या या वेळी म्हणाल्या.

नुकत्याच प्रदíशत झालेल्या ‘लाल इश्क’ या रहस्यपटात वैशाली सामंत यांनी गायिलेले ‘चांद मातला..’ हे गीत रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटासाठी पाश्र्वगायन करणे आणि त्यातही संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनबरोबर काम करायचे हा अनुभव खूप छान होता. या गाण्यानंतर दिग्गजांनी केलेले कौतुक हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे, असेही वैशाली सामंत यांनी सांगितले.

वैशाली सामंत म्हणाल्या, ‘‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. त्यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती होत असून त्याच्या संगीताची जबाबदारी माझ्यावर आहे, याचा मला अभिमान आहे. या चित्रपटासाठी लतादीदींनी एक गीत गायले आहे. लतादीदी माझ्यासाठी गायल्या ही गोष्टच माझ्यासाठी खूप मोठी आहे. पण, याच चित्रपटासाठी लतादीदी आणि आशाताई या दोघींनी एकत्र गाणे गावे असे माझे स्वप्न आहे.

यापूर्वी ‘जेता’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘खो-खो’ या चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून वैशाली सामंत यांनी काम केले आहे. आता कांचन अधिकारी यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला ‘किरण कुलकर्णी व्हस्रेस किरण कुलकर्णी’ हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातील संगीताची संपूर्ण जबाबदारी देखील सामंत यांनी पेलली असून या चित्रपटात सुबोध भावे आणि क्रांती रेडकर या दोन कलाकारांनी गाणे गायले आहे.

हे गाणे करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता, असेही सामंत यांनी सांगितले. संगीतकार म्हणून काम करत असताना मी गायिकेच्या पलीकडे जाऊन विचार करत असते. प्रत्येक वेळेला समोरच्या गायकाकडून काहीतरी नवीन काढून घेण्याची माझी इच्छा असते आणि ते मिळाल्यानंतरचे समाधान माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. याबरोबरच संगीतकार म्हणून काम करत असताना माझ्यातील गायिका आणखी घडत गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्या मराठी चित्रपट बदलतायेत, त्यातील गाणी लोकप्रियतेचा कळस गाठत आहेत, त्यांचा व्यवसाय हा कोटींच्या घरात जात आहे याबरोबर मराठी, अमराठी प्रेक्षक मराठी चित्रपट डोक्यावर घेत आहे हा बदल सकारात्मक आहे असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:45 am

Web Title: singer vaishali samant comments on lata ma and asha bhosle songs
Next Stories
1 येवलेवाडीचा आराखडा तीन महिन्यात तयार करा
2 ‘संवादामधून आव्हानांना सामोरे जाणे शक्य’
3 शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा!
Just Now!
X