26 February 2021

News Flash

एसकेएफच्या कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत

हा निधी नाम फाउंडेशनला देण्याचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला.

एसकेएफ कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी व कंपनीने मिळून नाम फाउंडेशनला पावणेआठ लाखांचा निधी नुकताच दिला. फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनी हा धनादेश स्वीकारला.

एसकेएफ इंडियामधील कर्मचाऱ्यांनी नाम फाउंडेशनच्या साहाय्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सहकारी संस्थेच्या खात्यातून लाभांशाच्या रकमेतून ही मदतीची रक्कम देण्यात येणार आहे. कंपनीनेही तेवढय़ाच रकमेची भर घालून हा निधी पावणेआठ लाखांपर्यंत नेला. हा निधी नाम फाउंडेशनला देण्याचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला.

कंपनी कर्मचारी आणि कंपनीच्या मदतीचा धनादेश अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांना एसकेएफ इंडियाच्या श्रीकांत सावंगीकर आणि एसकेएफ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोिवद शेवटे यांच्या हस्ते देण्यात आला.

कार्यक्रमात श्रीकांत सावंगीकर म्हणाले, की दोन वर्षांच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या असून त्यांना मदत करण्यासाठी नाम फाउंडेशनने कौतुकास्पद काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 3:20 am

Web Title: skf india worker help to drought affected farmer
Next Stories
1 रॉकेलचा लाभ घेणाऱ्या गॅसधारकांवर कारवाई
2 दोन हजार रोपांच्या वाटपाचा उपक्रम
3 शाळा सुरू होण्यास आठवडय़ाचा कालावधी तरीही पंचवीस टक्क्यांची प्रवेश प्रक्रिया ठप्पच
Just Now!
X