News Flash

बँकेतल्या क्षुल्लक वादातून डॉक्टरची तरुणाला लाथा, बुक्क्यांनी मारहाण

चाकण परिसरातील तरुणाला डॉक्टरने किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी डॉक्टर विरोधात तरुणाने तक्रार दाखल केली आहे.

चाकण परिसरातील तरुणाला डॉक्टरने किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी डॉक्टर विरोधात तरुणाने तक्रार दाखल केली आहे. डॉ.विजय गोकुळे अस आरोपीचे नाव आहे. अक्षय सीताराम साखरे असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फिर्याद दिली आहे.

दरम्यान आरोपी डॉक्टरच्या रुग्णालयासमोर तरुणाचा घरच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत मारहाण केल्याचा जाब विचारला. परंतु या घटनेप्रकरणी आम्ही कारवाई करणार नसल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी फिर्यादी अक्षय साखरे हा चाकण येथील बँक ऑफ इंडियामध्ये १२ च्या सुमारास पासबुक प्रिंटिंग करण्यासाठी गेला होता. त्याच्या पुढे आरोपी डॉक्टर विजय गोकुळे हे पासबुक प्रिंटिंग करत होते. तेव्हा तुमचं काम झालं असेल तर मला माझे पासबुक प्रिंटिंग करु द्या अस फिर्यादी अक्षय म्हणाला.

याच कारणावरून डॉक्टर विजय यांनी अक्षयला लाथा, बुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली तसेच दमदाटी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. अदखलपात्र गुन्हा असल्याने यात पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने अक्षयसह कुटूंबाने आज संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयासमोर येऊन आमच्या मुलाला का मारले ? अशी घोषणाबाजी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 11:34 pm

Web Title: small dispute in bank doctor beat youngster
Next Stories
1 पुण्यातील भाजपा नगरसेवकाची फॉर्च्युनर गाडीची चोरी
2 अंडरवेअर बनियान मध्ये चालक वाहकांचा जीव अडकलेला असतो-परिवहन मंत्री
3 सुनेने दारू आणून दिली नाही, सासरच्यांनी केला हत्येचा प्रयत्न
Just Now!
X