News Flash

वाहतुकीचा स्मार्ट आराखडा कागदावरच

शहरातील वाहतुकीची समस्या विचारात घेऊन स्मार्ट सिटीने वाहतुकीचा बृहत् आराखडा के ला आहे.

वाहतुकीचा स्मार्ट आराखडा कागदावरच

शहरातील सोळापैकी चार प्रकल्प कसेबसे पूर्ण

पुणे : शहरातील वाहतुकीची समस्या विचारात घेऊन स्मार्ट सिटीने वाहतुकीचा बृहत् आराखडा के ला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत हा आराखडा कागदावरच राहिल्याची वस्तुस्थिती असून प्रस्तावित सोळापैकी चार प्रकल्प कसेबसे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सुलभ दळणवळणाचा स्मार्ट सिटीचा दावाही फोल ठरला आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आल्यानंतर शहराच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात आला. लोकांची मते जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्याचा दावा करण्यात आला. स्मार्ट सिटीने के लेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील वाहतूक कोंडी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहतुकीचा बृहत् आराखडा करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर काही दिवसांत हा आराखडा जाहीर करण्यात आला. स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा, वाहतूक सोईसाठी जंक्शन विकसित करणे, सिग्नलचे सुसूत्रीकरण योजना, सिग्नलवर वाहनांची तपासणी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशिष्ट सेन्सरची उभारणी अशी यंत्रणा टप्प्याटप्याने कार्यान्वित करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र यातील कोणत्याही गोष्टी पाच वर्षांत झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. वाहतूक विभागाकडील सोळा प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांची कामे झाली आहेत. या प्रकल्पांसाठी ४४० कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे.

स्मार्ट सिटीने तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावर सायकल योजना सुरू के ली. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ आणि औंध भागात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू करण्यात आल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहराच्या अन्य भागात योजनेचा विस्तार करण्यात आला आणि काही काळानंतर योजना बंद पडली. योजनेतील त्रुटी दूर करण्यासही स्मार्ट सिटी प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे योजनाच गुंडाळावी लागण्याची वेळ स्मार्ट सिटीवर आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण करणे आणि वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी इंटेजिलन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले. हा प्रकल्पही तब्बल ३५० कोटींचा आहे. मात्र अद्यापही त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही. स्मार्ट सिटीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण तो निविदा प्रक्रियेपर्यंतही पोहोचू शकलेला नाही. सध्या ११९ जंक्शन तयार करण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा स्मार्ट सिटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रमुख चौक वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा प्रयोगही अयशस्वी ठरला आहे.

‘स्मार्ट सिटी’ची पाच वर्षे

वाहतूक नियोजन आणि वाहतूक नियोजनाची दृष्टी स्मार्ट सिटीकडे नाही. महापालिके कडेही ती नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून के वळ दाखविण्यासाठी योजना हाती घेण्यात येतात. मात्र त्यांचा उपयोगच होणार नसेल, तर काहीच होणार नाही. शाश्वत वाहतुकीचा विचार होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या अ‍ॅप तयार करण्यासारखे जुजबी प्रकार सुरू आहेत. पीएमपीला सक्षम करण्यासाठी काय करण्यात आले, हेही पुढे येणे अपेक्षित आहे.

– सुजित पटवर्धन, परिसर संस्था, विश्वस्त वाहतूक सुधारणेचा दावाही फोल

स्मार्ट सिटीकडून विजेवर धावणाऱ्या गाडय़ा (इलेक्ट्रिकल बस – ई-बस) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही चौकात सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आले असून वाहतूक पोलिसांना स्मार्ट बाइक देण्यात आल्या आहेत. हा अपवाद वगळता महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. त्यामुळे वाहतूक सुधारणेचा दावाही फोल ठरला आहे. सायकल मार्ग विकसित करण्यात आले असले तरी त्यांची दुरवस्था झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 4:07 am

Web Title: smart transport plan on paper ssh 93
Next Stories
1 अभागी शहर
2 पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा उद्या सायंकाळी बंद
3 पुणे, पिंपरीतील २५ भागांना, तर ८४ गावांना पुराचा धोका
Just Now!
X