News Flash

स्नेहालय संस्थेतर्फे लघुपट महोत्सव

अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेतर्फे २९ व ३० एप्रिल या काळात ‘युवा निर्माण लघुपट महोत्सव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

| February 5, 2014 02:40 am

अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेतर्फे २९ व ३० एप्रिल या काळात ‘युवा निर्माण लघुपट महोत्सव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून मिळणारा निधी हा विधायक कामासाठी वापरला जाणार आहे.
स्पर्धेत पाच विषय देण्यात आले असून १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ही स्पर्धा आहे. लघुपटाचा काळ १५ मिनिटे असणार आहे. तसेच विजेत्यांना २० हजार रुपये, महोत्सव चिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. स्पधेतील विषय- १) भारतीय स्त्री समोरची आव्हाने, २) बालके आणि मुलांचे प्रश्न, ३) कामाच्या ठिकाणचा भ्रष्टाचार, ४) पर्यावरण, एक जागतिक आव्हान, ५) युवा आणि सामाजिक बदल.
यापैकी कोणत्याही एका विषयावरील लघुपट ३१ मार्चपर्यंत ‘युवा निर्माण लघुपट महोत्सव, द्वारा, रिटेलवेअर सॉफ्टेक प्रा. लि, २१७, लोटस कोर्ट, हॉटेल पंचमीसमोर, सातारा रोड, पुणे- ४११००९, महाराष्ट्र, भारत या पत्यावर पाठवायचा आहे. महोत्सवाचे नियम आणि प्रवेशिका shortfilms.yuvanirman.in या संकेत स्थळावर मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०११६३७२००, ०२०-३२९१४७५३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 2:40 am

Web Title: snehalay short films competition
टॅग : Competition
Next Stories
1 ‘मावळ’साठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून लक्ष्मण जगताप यांच्याच नावाची शिफारस
2 राज ठाकरेंची सभा कुणीकडे? टिळक चौक की एसएसपीएमएस मैदान?
3 थोरले बाजीरावाच्या अश्वारूढ पुतळ्याची झाली दुरवस्था
Just Now!
X