पुणे : प्रार्थनास्थळांबाहेर, पदपथांवर, सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना आपण सहानुभूतीच्या भावनेतून पैसे देतो, पण त्यांचे ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ असे परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास पुण्यातील ‘सोहम ट्रस्ट’ने घेतला आहे.

भिक्षेकऱ्यांसाठी व्यावसायिक कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांना स्वावलंबी करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ‘सोहम ट्रस्ट’ला पाच गुंठे जागेची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
sanjay nirupam allegations on sanjay raut,
“संजय राऊतच खिचडी चोर, त्यांनी १ कोटी रुपयांची…”; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “ज्या कंपनीला…”
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनीषा सोनवणे हे दांपत्य गेल्या पाच वर्षांपासून भिक्षेकऱ्यांवर मोफत वैद्यकीय उपचार करीत आहे. शिवाजीनगर भागात त्यांचा लहानसा दवाखानाही आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ३० टक्के रक्कम ते भिक्षेकऱ्यांच्या उपचारांसाठी खर्च करतात.

एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून डॉ. अभिजित यांनी रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्यांसाठी काम सुरू केले. ‘सोहम ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील अकराशेहून अधिक भिक्षेकऱ्यांवर मोफत उपचार केले आहेत. इतकेच नव्हे तर ८५ भिक्षेकऱ्यांना काम देऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे. आणखी काही भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा ध्यास डॉ. अभिजित यांनी घेतला आहे.

वार्धक्य किंवा अन्य कारणांमुळे दृष्टी अधू झालेल्या भिक्षेकऱ्यांचे अपघात होतात. त्यात रात्रीच्या वेळी वाहन न दिसल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेऊन ‘सोहम ट्रस्ट’ने ५५० भिक्षेकऱ्यांच्या मोफत मोतििबदू शस्त्रक्रिया केल्या. तसेच ५४ लहान मुलांना भिक्षाटनापासून परावृत्त करून संस्थेने त्यांचे पालकत्व आणि शिक्षणाची जबाबदारीही घेतली आहे.

भिक्षेकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा ‘सोहम ट्रस्ट’चा मानस आहे. या केंद्रात विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी पुणे वा पुण्याच्या जवळपास पाच गुंठे जागा घेण्यासाठी ‘सोहम ट्रस्ट’ला मदतीची अपेक्षा आहे.