पुणे-मुंबईसारख्या शहरातील प्रत्येक इमारतीच्या पार्किंगमध्ये अनेक सायकली धूळ खात पडलेल्या, हे चित्र एका बाजूला, तर ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट असे विरोधाभासाचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसते. ही दरी भरून काढण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणजे ‘सायकल रि-सायकल’. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४० सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.
कोथरूडमधील स्प्रिंगफिल्ड सोसायटीपासून या उपक्रमाची सुरूवात झाली. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. सोसायटीतील अनेक मित्र या उपक्रमामध्ये सहभागी झाले. सर्वानी मिळून सायकली गोळा करायला सुरूवात केली. पार्किंगमध्ये वापरात नसलेली, धूळ खात पडलेली सायकल शोधणे आणि तिच्या मालकाशी बोलून त्या सायकलचा ताबा घेणे हा उद्योग सुरू झाला. बघता-बघता ४० पेक्षा अधिक सायकली जमा केल्या. यातील बहुतांश सायकली मोडकळीस आलेल्या आणि मोठय़ा प्रमाणावर डागडुजीची आवश्यकता असलेल्या होत्या. सायकल दुरुस्त करण्यासाठी काहींनी आर्थिक सहकार्य केले. दुकानदारांशी बोलून त्या आम्ही दुरुस्त करून घेतल्या, अशी माहिती कौस्तुभ चाटे यांनी दिली.
पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या विंझर या गावी जाऊन ४० सायकली शाळकरी मुलांना नुकत्याच देण्यात आल्या. शाळेनेही अशी गरजू मुले हेरुन ठेवली होती. मुलांनी उत्साहाने त्या सायकली ताब्यात घेऊन वापरायला सुरूवात केली. सायकली त्या मुलांपर्यंत पोहोचविण्याचा आणि मुलांनी त्या वापरताना बघण्याचा आनंद काही वेगळाच होता. आपली छोटीशी मदत कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकेल ही भावनाच आनंददायी होती, असेही चाटे यांनी सांगितले.
मग आम्ही हळूहळू इतर सोसायटय़ांमध्ये भेटून मदतीचे आवाहन केले. पार्किंगमध्ये धूळ खात पडलेली सायकल हा बहुतांश ठिकाणी असलेला समान प्रश्न आणि त्याला उत्तर शोधताना सामाजिक कामाची जोड मिळाली तर लोकांना ते हवेच होते. अनेकांनी त्यांच्या वापरात नसलेल्या सायकली देऊ केल्या. तर, काहींनी दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. सायकल रि सायकल उपक्रमांतर्गत लोकांनी जुनी सायकल द्यावी आणि आम्ही त्या दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवू, असे सांगत कौस्तुभ चाटे यांनी अधिक माहितीसाठी ८३०८९४५५०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद