News Flash

‘प्राचीन संस्कृती असलेला देश जाती व्यवस्थेमुळे विखुरलेला’

देशाची धर्म आणि जाती-पातींमध्ये विभागणी का?

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी देशातील जाती व्यवस्थेच्या मानसिकतेवर खंत व्यक्त केली. ज्या व्यवस्थेमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा व्यवस्थेला थारा द्यावा की नाही यावर विचार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी पुण्यातील कार्यक्रमात मांडले. धर्म आणि जाती-पातीच्या व्यवस्थेमुळे लोकांचा आत्मसन्मान विकलांग होत आहे. यामुळे समाज विखुरला जात असून देशाची ताकद कमी होत असल्याचे त्या म्हणाल्या. जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असलेल्या देशाची धर्म आणि जाती-पातींमध्ये विभागणी का करत आहोत, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ. विकास आबनावे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे आदी उपस्थित होते. मीरा कुमार म्हणाल्या की, बाबू जगजीवनराम यांनी ८२ वर्षांपूर्वी दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतचा लढा पुण्यातूनच संपूर्ण महाराष्ट्राभर पोहोचवला. जातीपातीविरोधात झालेल्या या क्रांतीनंतर अनेक मंदिराचे दरवाजे समाजातील प्रत्येकासाठी खुले झाले. परंतु आज अनेक मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांनी त्यांनी क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याची गरज आहे.

महिला, दलित, गरीब लोकांसाठी सरकार अनेक योजना राबविते. योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही. या समाज घटकांनी त्यांचे बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिले आहे. जे मागे राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ अणि नवीन भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करु, असेही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 5:27 pm

Web Title: society is scattered because of the caste system says meera kumar in pune
Next Stories
1 मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, १६ प्रवासी जखमी
2 बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवण्यासाठी पुणे-नाशिक मार्गावर रास्ता रोको
3 संरक्षण उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचे लष्कराचे धोरण
Just Now!
X