26 March 2019

News Flash

पुण्यात संगणक अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोन दिवसापूर्वीच या तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील सिंहगड परिसरातील नऱ्हे गावात राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वैष्णव आपर्टमेंटमध्ये समीर दशरथ पांचाळ हा तरुण राहत होता. या तरुणाने राहत्या घरी गळफास घेतला. त्याने स्वयंपाक घरातील छताला असणाऱ्या पंख्याच्या हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. दोन दिवसापूर्वीच या तरुणाने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या आत्महत्येमागील कारण अद्यापपर्यँत समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on March 13, 2018 8:18 pm

Web Title: software engineer suicide in pune