News Flash

‘सौर ऊर्जेचा वापर ही काळाजी गरज’

माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या सोलर प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

देशातील नैसíगक साधनसंपत्ती दुर्मिळ होत आहे. विजेची कमतरता जाणवत आहे. या परिस्थितीमध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे आवश्यक असून ती काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (एमएसएसएमए) वतीने राज्यातील पहिल्या सोलर प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद कमलाकर, संजय कुलकर्णी, संजय देशमुख, प्रदीप कुलकर्णी, एन. पी. पवार, रत्नाकर नळगीरकर, वरुण बिरमाळ यावेळी उपस्थित होते. शहराचा विस्तार झपाटय़ाने होत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे. शहरात सौर ऊर्जेचा मोठय़ा प्रमाणावर वापर वाढल्यास शहराचे पर्यावरण चांगले राहण्यास मदत होईल, असे टिळक यांनी सांगितले.

राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून सोलर उत्पादकांना विविध व्यावसायिक बाबींचे या प्रदर्शनात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:41 am

Web Title: solar energy important mukta tilak
Next Stories
1 बाजारभेट : फरशी, मार्बल आणि ग्रॅनाइटची बाजारपेठ
2 ‘जीएसटी’नंतरच्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
3 स्वरभास्कर पुरस्काराचा महापालिकेला विसर
Just Now!
X