News Flash

पुणे – जावयानेच घेतला सासऱ्याच्या गालाचा चावा

किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली

पुण्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादांध्ये जावाई आणि सासऱ्यामध्ये बिनसले. रागाच्या भरात जावायाने सासऱ्याच्या गालाचा चावा घेतल्याचा प्रकार हडपसरमध्ये घडला आहे. खंडू संतराम चैधरी असे जावयाचे नाव आहे. तर मच्छिंद्र येडूबा शिंदे (रा. पाटोदा बीड) असे सासऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी दोघांनीही परस्परविरोधी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

२८ वर्षीय खंडू आणि राणी काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही दिवसानंतर जावई मुलीशी फोनवर बोलू देत नसल्याने सासरे मच्छिंद्र आणि खंडू यांच्यात फोनवर वाद झाला. हा राग मनात ठेवून खंडूने सासऱ्यांना पुण्यात बोलवले. जावायाने आमंत्रण दिल्यानंतर सासू-सासरे आणि एक नातेवाईक हडपसर येथे आले होते.

चहापाणी झाल्यानंतर जावाई आणि सासऱ्यामध्ये पुन्हा बाचाबाची झाली. मच्छिंद्र यांनी मुलीला फोनवर बोलू का देत नाही? अशी विचारणा जावायाला केली. खंडूला या गोष्टीचा पुन्हा राग आला. जावाई रागाच्या भरात सासऱ्याच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्या गालाचा करकचून चावा घेतला. तसेच हाताच्या बोटाचा चावून तुकडा पाडला.

सासरे मच्छिंद्र यांना गंभीर जखमी केल्यामुळे जावायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलीसोबत बोलणे होऊ देत नसल्याच्या कारणावरुन मच्छिंद्रसह पत्नी राणी, सासूने खंडूला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढीत तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 10:38 am

Web Title: son in law take bite on father in law face in pune nck 90
Next Stories
1 वर्गात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक
2 लोकजागर : ..असंही घडायचं पूर्वी
3 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर डॉ. कोल्हे उद्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
Just Now!
X