आईच्या आजारपणामुळे नैराश्य आल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील थेरगावमध्ये घडली. गौतम चंद्रकांत ठोसर असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमची आई आजारी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आईच्या आजारपणाला कंटाळून बुधवारी  गौतमने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम ठोसर हा आई आणि त्याच्या मोठ्या भावासह भाड्याच्या खोलीत राहात होता. काही दिवसांपासून आई आजार असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,याच नैराश्यातून मयत गौतम ठोसर ने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते.

बुधवारी दुपारी मोठा भाऊ घरी आला मात्र,दरवाजा ठोठावला तरी आत मधून प्रतिसाद मिळाला नसल्याने दरवाजा उघडला नाही.तो परत रात्री आला त्यावेळी देखील असच झालं त्याने मित्रांना फोन करून बोलावून घेतलं आणि दरवाजा तोडला तेव्हा लहान भाऊ गौतम ने गळफास आत्महत्या केल्याच समोर आल.गौतम हा घरबसल्या इलेक्ट्रिकचे काम करत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे पुढील तपास करत आहेत.