31 October 2020

News Flash

पुण्यात पोस्टरबाजांना उधाण, आता पत्नीची माफी मागणारे नवे पोस्टर

‘शिवडे, आय एम सॉरी’ आणि ‘सविताभाभी तू इथच थांब’ या पोस्टरमुळे पुणेकर चक्रावले

पुण्याला एकीकडे बेकायदेशीर होर्डिंगनं घेरलं असताना दुसरीकडे कोणाचंही थेट नाव न घेता करण्यात येणारी पोस्टरबाजी पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. काल परवा ‘सविताभाभी तू इथच थांब’ या पोस्टरमुळे पुणेकर चक्रावले होते. त्यात आता हडपसर भागात पत्नीची माफी मागणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. हडपसरमध्ये हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय असून याबाबत पुणेकर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. ‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’ म्हणत हडपसरमधील विविध भागात फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

आपल्या नाराज पत्नीला मनवण्यासाठी एका डॉक्टरने हे फ्लेक्स लावल्याची चर्चा सुरु आहे. दोघेही पती-पत्नी डॉक्टर असून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे. पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमी असलेल्या या पोस्टरवर ‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’ याशिवाय इतर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे हे पोस्टर कोणी आणि का लावले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरची पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. तसेच पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरीमध्ये सध्या प्लेक्स लावून जाहीर माफी मागण्याची नवी पद्धत असल्याचं असं मत काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र सध्या या फ्लेक्सवरून सोशल मीडियात मात्र भन्नाट चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 7:52 pm

Web Title: sorry appu happy anniversary posters nck 90
Next Stories
1 व्हॅलेंटाईन डे निमित्त मुलींना दिलेली शपथ दुर्दैवी- आदिती तटकरे
2 सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा आजपासून
3 शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी ‘व्हर्च्युअल  ’ संवाद
Just Now!
X