आपल्या दमदार आवाजाने सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘बुलेट’ ची सध्या शहरात क्रेझ वाढत आहे. रस्त्यावर बुलेट संख्या मोठय़ा प्रमाणात दिसू लागली आहे. मात्र, या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मध्येच ‘फट’ असा मोठा आवाज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हा आवाज ध्वनिप्रदूषणाबरोबरच गर्दीच्या ठिकाणी अपघाताचे कारण ठरू शकतो. त्यामुळे असा फट आवाज वाजविणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईला सुरुवात केली. गेल्या पाच दिवसांमध्ये दोनशे बुलेट चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तरुणाईमध्ये अलिकडे बुलेट गाडीची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सहज रस्त्यावर उभे राहून पाहिले तरी रस्त्यावरून धावणाऱ्या बुलेट वाढल्याचे दिसून येते. तरुणांना रस्त्यावरून फट फट असा आवाज काढत जाणाऱ्या बुलेटबाबत खूपच आकर्षण आहे. त्यामुळे बुलेट खरेदी करताने अनेक जण खर्च करून फट असा आवाज निघावा म्हणून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करतात. सायलेन्सरमध्ये बदल करून काढल्या जाणाऱ्या या आवाजाला ‘इंदूर फटका’ असे म्हटले जाते. दुचाकीचा कोणताही फिटर सायलेन्सरमध्ये बदल करून हा आवाज काढून देतो. पण, हा आवाज काढणे कायदेशीर नाही. या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होते. तसेच, गर्दीच्या रस्त्यावर बुलेटचा मोठा आवाज आल्यामुळे शेजारचा वाहनचालक एकदम दचकून अपघात होण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना बुलेटच्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी काही वाहन चालकांनी वाहतूक शाखेकडे केल्या होत्या. त्यामुळे सायलेन्सरमध्ये बदल करून फट असा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईला वाहतूक शाखेने सुरुवात केली आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये शहरात विविध ठिकाणी तब्बल दोनशे बुलेट चालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी करवाई केली  आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक