26 September 2020

News Flash

मंगल कार्यालयांजवळील ध्वनिप्रदूषण थांबणार

विवाह किंवा इतर कार्यक्रमांच्यावेळी मंगल कार्यालये व लॉन्समध्ये डीजेंच्या भिंती व इतर वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आता आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

| April 12, 2015 04:53 am

विवाह किंवा इतर कार्यक्रमांच्यावेळी मंगल कार्यालये व लॉन्समध्ये डीजेंच्या भिंती व इतर वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आता आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगल कार्यालये व लॉन्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमामुळे नाहक ध्वनिप्रदूषण करता येणार नसून कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंद करावेत, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १९-२ अन्वये कारवाई करावी, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती विकास किनगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावरील सुजल सहकारी गृहनिर्माण संस्थातील नागरिकांनी ध्वनिप्रदूषणा संबंधी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीनंतर हा आदेश दिला आहे.
 विवाहाच्यावेळी वरात काढणे किंवा मोठय़ाने संगीत लावणे या विवाहाच्या रूढीपरंपरांचा धर्माशी काहीही संबंध नाही. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषण करता येणार नाही असे स्पष्ट मत खंडपीठाने व्यक्त केले आहे. विवाहापूर्वी मंदिरात देवदर्शनासाठी जायचे असेल तर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंगाट न करता जावे आणि अशा छोटय़ा वरातीबाबत वाहतूक विभागाला कोणत्या रस्त्यावरून मिरवणूक जाणार आहे याचीही पूर्वकल्पना द्यावी. अशा गोंगाटाचा समावेश असलेल्या वराती किंवा मिरवणुका आढळल्यास डीजे सिस्टिम किंवा संगीत वाद्य साहित्य वाहतूक पोलिसांनी जप्त करावे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका यांनी कारवाई करावी, असा आदेशही न्यायाधिकरणाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:53 am

Web Title: sound pollution clipped at marriage halls
Next Stories
1 प्रत्येक जिल्ह्य़ात मातृ दूध पेढी सुरू करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न – केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा
2 ..तर युवा शक्ती संकट म्हणून उभी राहील!
3 मुळगावकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
Just Now!
X