डॉल्बीचा दणदणाट आणि आवाजाची चढाओढ

डीजे आणि स्पीकरच्या अवाढव्य भिंती, त्यावर वाजवली जाणारी मराठी, हिंदूी चित्रपटांमधील उडत्या चालींची गाणी आणि या गाण्यांवर बेभान होऊन तरुणाई नाचत होती. विविध रंगांचे तीव्र प्रकाशझोत वापरले जात होते आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना हरताळ फासत बुधवारी सकाळी टिळक, कुमठेकर, केळकर रस्त्यांवरील मिरवणुका मार्गस्थ होत होत्या.

two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

मध्यरात्रीचा बाराचा ठोका झाल्यानंतर गणेश मंडळांनी पुढे न जाता आपापले ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि बंद झालेले डीजे बुधवारी सकाळी बरोबर सहा वाजता पुन्हा वाजू लागले. ध्वनिक्षेपकाच्या भिंती आणि त्याच्या ठेक्यावर ताल धरत जराही उत्साह कमी न झालेले कार्यकर्ते गणेश विसर्जन होईपर्यंत नृत्य करत होते. शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त कुमठेकर रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्त्याला पसंती दिल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या गणेश मंडळांची संख्या यंदा तुलनेने कमी होती. गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण विकास मंडळाच्या गणेशमूर्तीचे दुपारी साडेअकराच्या सुमारास विसर्जन झाल्यानंतर कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीची सांगता झाली. यंदा गणेशोत्सवात लक्ष्मी रस्त्यासह, केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यांवरील बहुतांश मंडळांनी मराठी गीते वाजवणे पसंत केले. उडत्या चालींवरील आणि रिमिक्स केलेल्या गाण्यांवर तरुणाई थिरकली. याबरोबरच एकामागोमाग असणारी मंडळे आणि एकाच रस्त्यावरुन विसर्जन करून परतणाऱ्या आणि विसर्जनाला जात असलेल्या मंडळांमध्ये गाणी जोरात लावण्यावरुन जणू स्पर्धा सुरु होती.

पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये वादावादी

गाणी मोठय़ा आवाजात लावण्यावरुन पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र बुधवारी सकाळी दिसले. दुपार झाली तरीदेखील अनेक गणेश मंडळे अत्यंत धिम्या गतीने पुढे जात होती. त्यामुळे टिळक रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच डीजेचा आवाज कमी करण्यावरुन आणि मंडळ लवकर पुढे नेण्यावरुन पोलिस आणि गणेश मंडळांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवले

वाहतूक पोलिसांची कसरत

श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर अनेक मंडळे लाल बहाद्दूर शास्त्री रस्त्याने परत फिरली. विसर्जनानंतरही त्यांचे डीजे सुरुच असल्याने आणि गाण्यांवर कार्यकर्ते नाचत असल्याने या रस्त्यावरुन वाहनचालकांना पुढे जाता येत नव्हते. बुधवारी सकाळी नोकरदार आपापल्या वाहनांनी घराबाहेर पडले, पण रस्ते मिरवणुकांमुळे बंद असल्याने दांडेकर पूल, दत्तवाडी, म्हात्रे पूल भागात सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक  पोलिसांची तारांबळ उडाली.