पुणे : प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुण्यावरून अहमदाबाद, भूज आणि भगत की कोठी (जोधपूर, राजस्थान) या ठिकाणांसाठी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट विशेष रेल्वे पुण्याहून २३ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी रात्री ८.१० वाजता अहमदाबादसाठी सोडण्यात येईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. अहमदाबादहून २४ जानेवारीपासून प्रत्येक रविवारी रात्री ८.२० वाजता पुण्यासाठी गाडी सोडण्यात येईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३५ वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, दहानू रोड, वापी, वळसाड, नवसारी, सुरत भरूच, वडोदरा जंक्शन, आनंद जक्शन, नाडियाड जंक्शन या स्थानकावर थांबा असेल.

पुणे-भगत की कोठी या मार्गावर २४ जानेवारीपासून प्रत्येक रविवारी रात्री ८.१० वाजता गाडी सोडली जाईल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता भगत की कोठी स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुण्यासाठी २६ जानेवारीपासून प्रत्येक मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता गाडी सोडली जाईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३५ वाजता पुण्यात येईल. या गाडीला शिवाजीनगर, लोणावळा, कर्जत, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, वलसाड, सूरत, भरूच, नडियाद, अहमदाबाद, पालनपूर, आबू रोड, मारवाड, पाली, लूणी आदी स्थानकांवर थांबा असेल. पुणे-भूज मार्गावर २५ जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी पुण्याहून रात्री ८.१० वाजता गाडी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता भूजला पोहोचेल. २७ जानेवारीपासून प्रत्येक बुधवारी भूज स्थानकावरून दुपारी १.२५ वाजता पुण्यासाठी गाडी सोडण्यात येईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३५ वाजता पुण्यात पोहोचेल. शिवाजीनगर, लोणावळा, कल्याण भिवंडी, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, भरूच, वडोदरा, मणिनगर, अहमदाबाद, विरामग्राम, गांधीधाम, अंजार आदी स्थानकांवर गाडीला थांबा असेल.