राज्य मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असून पुणे विभागीय मंडळाने पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्य़ातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मदतक्रमांक दिले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य मंडळाचा दहावीचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकालासंबंधी काही अडचणी आल्यास त्यासाठी पुणे विभागाने विभागीय स्तरावर मदतक्रमांक सुरू केला आहे. त्याचप्रमाणे कमी गुण मिळालेल्या, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून समुपदेशनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे, नगर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्य़ांसाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे त्यांनी २३ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत. दिशा संस्थेतर्फेही विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० -२०९-४३५३ या टोल फ्री कमांकावर अथवा ९९२२००११२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे विभागीय हेल्पलाइन – ९४२३०४२६२७
समुपदेशनासाठी क्रमांक – ८६००५२५९०८
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 17, 2014 2:45 am