News Flash

शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी बसला भीषण अपघात; १३ विद्यार्थी जखमी

तीन मुलांची प्रकृती गंभीर

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. या अपघातात १३ पैकी पाच विद्यार्थी आणि एसटी बसचा चालक गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या महामार्गावर लगत असलेल्या खिंडीत पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय सहल अलिबाग, महाबळेश्वर या ठिकाणाहून घरी परतत असताना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव येथे हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली एसटी बसनं रस्त्यात बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जाऊन पाठीमागून धडक दिली.

या घटनेत १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महामार्गालगतच्या पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहल होती. बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आज सहलीचा शेवटचा दिवस होता आणि सर्व विद्यार्थी गाढ झोपेत असताना अचानक अपघात झाला. हे सर्व विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील बी.जे. खताळ विद्यालयातील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 8:54 am

Web Title: st bus accident students and teachers injured some serious mumbai pune old highway jud 87
Next Stories
1 ऐन थंडीच्या हंगामात शहरात पावसाच्या सरी
2 उद्योगनगरीतील पाणीसमस्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
3 जेवणाचे पैसे न दिल्याने वाद; हॉटेलमध्ये सुरक्षारक्षकाकडून गोळीबार
Just Now!
X