27 February 2021

News Flash

औद्योगिक नगरीतून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा मालही ‘एसटी’ राज्यभरात पोहचवणार

माफक दराबरोबरच चोवीस तास सुविधा उपलब्ध असणार

लॉकडाउनमुळे जिल्ह्या बाहेर किंवा राज्यात शेतीमाल पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांसह इतर व्यापाऱ्यांनाही बसल्याने, त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु, आता लाल परी (एसटी बस) पिंपरी-चिंचवड परिसरातील शेतकरी,  व्यापारी, लघु आणि मोठे कारखानदार यांचा माल राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी माफक दरात पोहचविणार आहे. २८ रुपये प्रति किलोमीटर दर आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार असून, २४ तास एसटी बस उपलब्ध असणार आहे, अशी माहिती वल्लभनगर डेपोच्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असून, लघु उद्योजक, मोठे कारखानदार, शेतकरी आणि व्यापारी हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी एसटी बस माफक दरात माल वाहतूक करणार आहे. यात किमान ४ टन माल असणे आवश्यक असून जास्तीत जास्त ७ टन माल वाहतूक करता येणार आहे. यामध्ये शेती माल, आरोग्य संबंधी साहित्य किंवा वस्तू,  आंब्याच्या पेट्यासह इतर माल वाहतूक करता येणार आहे. परंतु,  बसद्वारे ज्वलनशील आणि स्फोटक मालाची वाहतूक करता येणार नाही, असे पल्लवी पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे एसटी बसचे भाडे हे केवळ माल घेऊन जातानाचेच घेण्यात येणार आहे.

सध्या करोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर असल्याने, प्रत्येक बस ही निर्जंतुक केलेली असणार आहे. तसेच, एसटीचा प्रवास हा सुरक्षित मानला जातो. त्यामुळे सुरक्षित पद्धतीने माल पोहचवला जाणार आहे. जिल्हाबंदी असल्याने वाहतुकीला पर्याय म्हणून एसटी बसने वाहतूक केली जात आहे. त्यानुसार  एसटी बसला अधिक प्राधान्य द्यावं, अस आवाहन पल्लवी पाटील यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना केले आहे. विशेष म्हणजे रेडझोनमध्ये ही वाहतूक होणार असून त्यासाठी तेथील व्यक्ती माल घेण्यास तयार हवा, त्यानुसार त्याला एसटी बसद्वारे माल पोहचवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. पुढील आदेश येईपर्यंत एसटी बस माल वाहतूक करणार असल्याचं यावेळी त्या म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 6:20 pm

Web Title: st will also deliver goods from farmers and traders across the state from the industrial city msr 87 kjp 91
Next Stories
1 आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार : कृषीमंत्री दादा भुसे
2 पुण्यात पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची कोयत्यानं वार करून हत्या
3 जिल्ह्य़ातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण
Just Now!
X