26 February 2021

News Flash

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पिंपरीतही सायकल सुविधेस प्रारंभ

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी आदी भागांतील ३४ ठिकाणी ही सायकल सुविधा दिली जाणार आहे.

पिंपरी पालिकेच्या सायकल योजनेचा प्रारंभ पिंपळे सौदागर येथे झाला. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील त्रास कमी करण्यावर भर; वाहतूक समस्येलाही आळा बसणार

पिंपरी पालिकेच्या सायकल सुविधा योजनेमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार असून, वाहतुकीच्या समस्येला आळा बसेल, असा विश्वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केला आहे. तर, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील त्रास कमी व्हावा, यासाठी सायकल सुविधेबरोबरच पदपथांची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पिंपरी पालिकेच्या सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप तसेच महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाला.

पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते.

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी आदी भागांतील ३४ ठिकाणी ही सायकल सुविधा दिली जाणार आहे.

द्वारकादेश सोसायटी, साई आंगण, कुणाल आयकॉन, कुंजीर गार्डन, गुरुकुल, साई गार्डन, गोविंद-यशदा चौक, पी. के. चौक, निसर्ग निर्मिती, रिलायन्स फ्रेश, राधिका शॉप, शिवाजी महाराज पुतळा चौक, महादेव मंदिर, काटे पूरम, रामकृष्ण चौक, जवळकर चौक, कल्पतरू, तुळजामंदिर, जिजाऊ उद्यान, दापोडी रोड, शिवगणेश चौक, नीलम सुपर मार्केट आदी ठिकाणी सवलतीच्या दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वेळी महापौर जाधव म्हणाले, की प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल योजना महत्त्वाची ठरणार आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, की स्मार्ट सिटीचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

दिवसेंदिवस रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे मोकळे रस्ते वा इतर जागांची कमतरता तीव्रतेने भासू लागली आहे. त्यामुळे इंधनावरील वाहतुकीला नवा पर्याय म्हणून सायकलकडे पाहिले जात आहे. शारीरिक व्यायाम आणि इंधनाची बचत ही यामुळे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:45 am

Web Title: start of cycle facility under smart city
Next Stories
1 शहरबात : चर्चा भरपूर, कृती कधी होणार?
2 कॉसमॉस बँक सायबर हल्ला, ९४ कोटींपैकी २ कोटी ५० लाख काढले देशातून
3 नगरसेवक हरवल्याचे पुण्यात फ्लेक्स; नागरी सुविधांकडे लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप
Just Now!
X