‘ड्रग फ्री इंडिया’ या देशव्यापी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेत शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये युवकांमध्ये जागृती, युवकांशी संवाद हा उपक्रम राबविण्यात आला. ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत एआयएसएसएमएस इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी, पीव्हीपीआयटी इंजिनियरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी वेब कास्टद्वारे सहभागी झाले होते. पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजीचे अध्यक्ष डॉ.अमित दत्ता आणि संयुक्त सचिव सुरेश शिंदे यांचीही उपस्थिती होती.  अमली पदार्थाचे सेवन रोखून आपण या देशातील युवकांना बळकट करायला हवे.  नशा करीत नाही, याचा अभिमान वाटण्याची वेळ आली आहे. हाच विचार आनंद देऊ  शकतो, असे या संवादात सांगण्यात आले.

‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘ड्रग फ्री इंडिया’ या मोहिमेअंतर्गत पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.