ग्रामीण भागांत पहिल्या दिवशी चार टक्के  विद्यार्थी उपस्थित

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी के वळ चार टक्के  विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्यानंतर करोनाबाबत आवश्यक काळजी घेण्यात येत आहे. तरीही विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास उपचारांची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार आहे.

ग्रामीण भागातील एकू ण १२४६ खासगी शाळांपैकी पहिल्या दिवशी २१५ शाळा सुरू करण्यात आल्या, तर ९४३३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण के वळ चार टक्के  एवढे होते. करोनाचा संसर्ग होईल, या भीतीने पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. मात्र, करोना संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद स्वीकारणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सोमवारी दिली.

‘नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, मात्र पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल. याशिवाय सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शरीर तापमान, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण तपासून सुरक्षित अंतराचे पालन करण्यात येत आहे. आवश्यक खबरदारी घेऊनही विद्यार्थ्यांना संसर्ग झाला, तर त्यांच्या उपचारांची जबाबदारी जिल्हा परिषद घेणार आहे’, असे उपाध्यक्ष शिवतरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसल्याने तसेच पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यावरून संभ्रम असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती पहिल्या दिवशी कमी राहिली. आतापर्यंत ६५६५ शिक्षक, शिक्षके तर कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतर शिक्षक शाळेत रुजू होतील. १ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०० टक्के  शाळा सुरू करण्यात येतील, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.

लोणावळ्यात शाळांची घंटा वाजलीच नाही

लोणावळा / बारामती / इंदापूर : जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याला मुभा दिल्यानंतरही पालकांच्या संमतीअभावी सोमवारी लोणावळ्यात शाळा भरल्याच नाहीत. बारामतीमध्ये के वळ तीन, तर इंदापुरात मात्र ३३ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे. त्यानुसार बहुतांश शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक सभा घेतल्या होत्या. मात्र, बहुतांश पालक हे मुलांना शाळेत न पाठवण्यावर ठाम असल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती होती.

पुण्यात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, शिक्षकांच्या करोना चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्याने सोमवारी लोणावळ्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. लोणावळा नगरपरिषदेने सोमवारी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. त्यामध्येही पालक संमती देत नसल्याचा सूर मुख्याध्यापकांनी आळवला. पालकांच्या संमतीशिवाय शाळा सुरू करणे शक्य नाही. याशिवाय शाळांमध्ये गेल्यानंतर संसर्ग झाल्यास सर्वस्वी पालकांची जबाबदारी राहील, असे संमतीपत्रात शाळा व्यवस्थापनांनी म्हटले आहे. त्यामुळे जोवर लस येत नाही किं वा करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत शाळा बंदच ठेवाव्यात, अशी मागणी पालक करत आहेत.

दरम्यान, बारामतीमध्ये पहिल्या दिवशी के वळ तीन शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती. विद्या प्रतिष्ठानची शाळा मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, इंदापुरात ३३ शाळांमधून १३८८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.