25 February 2021

News Flash

फर्ग्युसन महाविद्यालय नाही तर विद्यापीठ, राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्य फर्ग्युसन विद्यापीठ अशी या महाविद्यालयाची ओळख असणार आहे. ही माहिती फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन कुलकर्णी यांनी दिली.
राज्यमंत्री मंडळाच्या निर्णया बाबत नितीन कुलकर्णी म्हणाले की, फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना 1885 साली लोकमान्य टिळक, थोर समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती. या संपूर्ण कालावधीत अनेक नामवंत व्यक्ती महाविद्यालयामधून पुढे गेले आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयास स्वायत्तता दर्जा 2016 या वर्षी मिळाला होता.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत 2018 वर्षी प्रस्ताव मागविण्यास एचआरडी विभागाकडून सुरवात करण्यात आली. तर देशभरातील 10 महाविद्यालयाचा सरकारकडे विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रस्ताव आला होता. त्यामध्ये फर्ग्युसन पाहिले आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फर्ग्युसनमहाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून महाराष्ट्र राज्य फर्ग्युसन विद्यापीठ या नावाने गुणपत्रिका मिळणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळाला असल्याने आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 7:22 pm

Web Title: state cabinet ministry decisions on ferguson college and other
Next Stories
1 मैत्रिणीला सोडून परत येताना तरुणाचा अपघाती मृत्यू, हेल्मेट घातले असते तर…
2 पुण्यातील दापोडीत ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या
3 शनिवारवाडयाचा उघडलेला दिल्ली दरवाजा बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी
Just Now!
X