स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची योजना, एकावेळी ४०० विद्यार्थ्यांना अभ्यासिके चा लाभ

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सिटी लायब्ररी’ उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून स्थायी समितीने या प्रकल्पाच्या सहा कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेला मंगळवारी मंजुरी दिली. महापालिके ने केलेली राज्यातील ही पहिली ‘सिटी लायब्ररी’ ठरणार आहे.

घोले रस्त्यावर महापालिके च्या महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारत आहे. २२०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील (२३ हजार ६७२ चौ.फू ट) ही इमारत खूप जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन प्रशस्त इमारतीत सिटी लायब्ररी बांधण्यात येणार आहे. शहरातील आणि राज्यातील हजारो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. त्यामध्ये के ंद्रीय नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बँकिं गच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मोठय़ा प्रमाणात संदर्भ साहित्याची गरज असते.

हे साहित्य पारंपरिक ग्रंथालयातील पुस्तकांच्या स्वरूपात आणि आधुनिक डिजिटल ग्रंथालयाच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर के ला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज वर्ग खोल्या उपलब्ध होणार आहेत. एकावेळी एक हजार विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. त्यांना तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळेल. या प्रकल्पासाठीचा प्रस्ताव नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी दिला होता तसेच सुरुवातीपासून पाठपुरावा के ला होता, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ८२६५ चौ.फू ट जागा व्यावसायिक कार्यालयांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यामुळे  महापालिके स उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होणार आहे. दुसऱ्या मजल्यावरील ग्रंथालयात ५० हजार पुस्तके  संग्रहित करता येणार असून पुस्तके  तेथेच वाचण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या मजल्यावर एकावेळी ४०० विद्यार्थी अभ्यासिके चा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच डिजिटल ग्रंथालय, ई-ब्राऊझिंग के ंद्र अशी अत्याधुनिक व्यवस्था असून ४० संगणकांसहित बैठक व्यवस्थेचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १३ कोटी रुपये लागणार आहेत, असेही रासने यांनी सांगितले.

प्रस्तावित इमारत अशी असेल..

सिटी लायब्ररीची प्रस्तावित इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी असेल. तळमजल्यावर वाहनतळ, जिना, उद्वाहन आणि स्वच्छतागृह असेल. पहिला मजल्यावर व्यावसायिक कार्यालय, उपाहारगृह आणि स्वच्छतागृह, दुसऱ्या मजल्यावर प्रतीक्षालय, ग्रंथालय, मासिके   व नियतकालिके  विभाग, नवीन पुस्तके  विभाग, आवक विभाग, वाचन कक्ष, बैठकीची खोली, ग्रंथ प्रदर्शन दालन, तर तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिका, संदर्भ वाचन विभाग, डिजिटल ग्रंथालय यांचा समावेश आहे.