डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाल्याच्या दिवशी रविवारी अंधश्रद्धा निमूलन समितीच्या वतीने ‘चला विवेकाचा आवाज बुलंद करू’ या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. पुढील एक महिन्यामध्ये राज्यभर हे आंदोलन राबविण्यात येणार आहे.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सचिव मिलिंद देशमुख, हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी दाभोलकर यांची हत्या झालेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली. अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑक्टोबरला दोन महिने पूर्ण झाले. मात्र, अद्यापही मारेकरी पोलिसांच्या हाती लागत नसल्याच्या निषेधार्थ विविध संस्था व संघटनांच्या वतीने रविवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. सर्वच वयोगटातील नागरिकांनी त्यात सहभाग घेतला.

नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आंदोलनात इतरांचा सहभाग घेणे, जादूटोणाविरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचविणे. त्याचप्रमाणे समितीमध्ये नव्या कार्यकर्त्यांची नोंद करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील दीडशे ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानाच्या सुरुवातीला दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याबद्दल शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणाऱ्या निवेदनासाठी सह्य़ांची मोहीमही घेण्यात आली. अभियानात राज्यभर अशा सह्य़ा घेण्यात येणार आहेत. अभियानाच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी समितीचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. राज्यात विविध ठिकाणी सदस्यत्वासाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.