प्रलंबित वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातर्फे  होणारी ऑनलाइन सत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊनही अद्याप काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे वेळापत्रक नसताना  परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न  विद्यार्थ्यांनी उपस्थित के ला असून,  तातडीने वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे  १० एप्रिलपासून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहे. या परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना कल्पना येण्यासाठी ५ एप्रिलपासून सराव परीक्षाही घेण्यात येत आहे. मात्र काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अभ्यासक्रमाची तयारी करता येत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.

विद्यापीठाने प्रलंबित वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. तसेच सराव परीक्षेस फे स रेकग्निशनसारख्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. विद्यापीठाने या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, असे युक्रांदचा पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे याने सांगितले.

विद्यापीठाच्या सध्याच्या सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. काही जुन्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमाचे, ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या कमी आहे, त्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर होणे बाकी आहे. हे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल. – महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग